Raj Thackeray : नाव आणि निशाणी असो की नसो मीच बाळासाहेबांचा विचार पुढं नेणार, राज ठाकरेंचं उद्धव यांना आव्हान
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेचं अधिक होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाचं नाव आणि निशाणी यावर कोर्टात वाद सुरू आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज यांनी आगामी निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचे आदेश दिलेत. नाव आणि निशाणी नसली, तर बाळासाहेबांचा विचार मीच पुढं नेणार, असा टोला राज यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. राज म्हणाले, दगा फटका करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो मी. बाळासाहेबांना भेटून, त्यांना सांगून मी बाहेर पडलो आहे. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सांगतात. सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. त्यावेळी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल राज यांनी उद्धव यांना विचारला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा उद्धव ठाकरेचं अधिक होते. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाचं नाव आणि निशाणी यावर कोर्टात वाद सुरू आहे.