Raj Thackeray On Ketaki Chitle : केतकी चितळेच्या पोस्टवर राज ठाकरेंची पहिली अन् सविस्तर प्रतिक्रिया

| Updated on: May 14, 2022 | 4:43 PM

केतकी चितळेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

मुंबई : शुक्रवारी केतकी चितळेने (Ketaki Chitle) पुन्हा शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) एक वादग्रस्त पोस्ट केली आणि त्यानंतर राज्यात पुन्हा यावरून राजकीय घमासान सुरू झालं. त्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. राज ठाकरेंनी केतकी चितळेला कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, अशी पोस्ट करत इशारा दिला आहे. केतकी चितळेच्या या पोस्टवरून सध्या राष्ट्रवादीही (NCP) चांगलीच आक्रमक झाली आहे. केतकी चितळेविरोधात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील यानी केतकी चितळेला चोप देऊ असा इशाराही दिला आहे. तर केतकी चितळेवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. आणि आता महाराष्ट्राटाला एक मोठी राजकीय परंपरा आहे. त्यामुळे ती कायम राहवी अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Published on: May 14, 2022 04:43 PM
Ketaki Chitale : मोठी बातमी, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रांच करणार
Amol Kolhe On Ketaki Chitale | Sharad Pawar यांच्या बद्दल गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध : खासदार अमोल कोल्हे