Raj Thackeray यांच्या नातवाचं नाव ‘किआन’; शिवतीर्थवर पार पडला नामकरण सोहळा

| Updated on: May 06, 2022 | 2:54 PM

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला.

शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा (Raj Thackeray Grandson) नामकरण सोहळा पार पडला. 5 एप्रिल रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. आज (शुक्रवार) पार पडलेल्या नामकरण सोहळ्यात राज यांच्या नातवाचं नाव ‘किआन’ (Kiaan) असं ठेवण्यात आलं. या सोहळ्यानिमित्त शिवतीर्थ फुलांनी सजवण्यात आला. अमित आणि मिताली यांचा साखरपुडा 11 डिसेंबर 2017 रोजी झाला होता. तर जवळपास वर्षभराने म्हणजे 27 जानेवारी 2019 रोजी ते विवाहबंधनात अडकले होते. काही दिवसांपूर्वीच अमित यांनी बाळाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.

Published on: May 06, 2022 02:54 PM
Ramdas Athawale | मी आलो आहे आटपाडीच्या घरात ! रामदास आठवले यांचा शायराणा अंदाज – tv9
Ramdas Athawle | शिवसेनेनं पाप केलं आणि काँग्रेस, NCP सोबत युती केली! आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला