Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान कुणाचं? सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार?

| Updated on: Nov 24, 2023 | 5:22 PM

राज्यातील 200 जागांवर एकाच टप्प्यात 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 14 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच राज्यात नवं सरकार येणं आवश्यक

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या 200 जागांसाठी मतदान होणार आहे. यातील 33 जागा अनुसूचित जातीसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून 142 जागा खुल्या वर्गासाठी आहेत. राज्यातील 200 जागांवर एकाच टप्प्यात 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. राजस्थान विधानसभेचा कार्यकाळ 14 जानेवारी 2024 रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच राज्यात नवं सरकार येणं आवश्यक आहे. राज्यात 5 कोटी 26 लाख 80 हजार 545 मतदार आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत आहे. बसपा, आरएलपी, सपा, बीटीपी, डावे आणि आरएलडी आदी पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजस्थानच्या साडे तीन दशकाच्या इतिहासात सत्तेच्या परिवर्तनाचा ट्रेंड राहिला आहे. राज्यात दर पाच वर्षाने सत्ता बदल हा भाजप आणि काँग्रेसमध्येच होत आलाय.

Published on: Nov 24, 2023 05:22 PM