Rajasthan: राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना, 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथविधी सुरू
राजस्थान सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यानंतर आज राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत.
राजस्थान सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामे दिल्यानंतर आज राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येत आहे. आमदार मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. 11 आमदारांना कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदाची शपथ दिली जात आहे. राजस्थानमध्ये नवीन मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्री झालेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले, आज राजस्थान सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन. गेल्या 35 महिन्यांत आपल्या सरकारने राज्याला संवेदनशील, पारदर्शक आणि उत्तरदायी सुशासन देण्याचे काम केले आहे. सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपल्या सरकारने राज्याला विकासाच्या वाटेवर नेले आहे.