राजेंद्र गावित मला भेटायला आले होते – एकनाथ शिंदे
"राजेंद्र गावित मला भेटायला आले होते. मुख्यमंत्री झाल्यावर भरपूर लोक भेटायला येतात"
मुंबई: “राजेंद्र गावित मला भेटायला आले होते. मुख्यमंत्री झाल्यावर भरपूर लोक भेटायला येतात. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे खड्डे पडतात, नागरिकांना जो त्रास होतो, त्या बाबत आणि वाहतूक कोंडी संदर्भात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.