Jalna | जालन्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी, हलगीच्या तालावर राजेश टोपेंनी फिरवली लाठीकाठी
Rajesh Tope | जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आरोग्यमंत्र्यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Annabhau Sathe) यांची जयंती रविवारी (एक ऑगस्ट) उत्साहात साजरी झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी लाठीकाठी फिरवली. जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ आरोग्यमंत्र्यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.
‘संयुक्त महाराष्ट्र’ व्हावा यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी लढा दिला. महाराष्ट्र आज कोरोनाशी लढा देत असताना जालन्यात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. इतकंच नाही, तर हलगीच्या तालावर त्यांनी लाठीकाठीही फिरवली. राजेश टोपेंचं हे रुप पाहून मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.