Corona Third wave : केरळमध्ये एका दिवसात 31 हजार रुग्ण, तिसऱ्या लाटेबद्दल राजेश टोपे काय म्हणाले?
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. कोरोनाचा कोणताच मृत्यू लपवला नाही हे ठामपणे सांगतो, असं टोपे म्हणाले. तसंच केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.
मुंबई : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली. कोरोनाचा कोणताच मृत्यू लपवला नाही हे ठामपणे सांगतो, असं टोपे म्हणाले. तसंच केरळमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. केरळमध्ये ओनम हा सण साजरा झाला. तिथे गर्दी झाली होती. त्यामुळे एकाच दिवसात मोठी रुग्णसंख्या वाढली. मी स्वत: केरळच्या आरोग्य मंत्र्यांशी फोन करुन बोललो. 31 हजार केसेस एकाच दिवसात आल्या. तिसऱ्या लाटेची सुरुवात केरळमधून झाली असं समजायचं का? त्यावर त्यांनी दोन कारणं सांगितली, असं टोपे म्हणाले.