महाराष्ट्रात तो पर्यंत लॉकडाऊन नाही, राजेश टोपे यांचं वक्तव्य
सध्या लॉकडाऊनचा कोणताही विषय नाही. आम्ही यापूर्वीही यासंदर्भात सांगितलेलं आहे. जो पर्यंत सातशे मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागत नाही तो पर्यंत लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नाहीत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
जालना: सध्या लॉकडाऊनचा कोणताही विषय नाही. आम्ही यापूर्वीही यासंदर्भात सांगितलेलं आहे. जो पर्यंत सातशे मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागत नाही तो पर्यंत लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नाहीत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. या बाबतच्या सूचना मागच्याच महिन्यात देण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे जेव्हा सातशे मेट्रिक टन पेक्षा ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात निर्बंध लागू शकतात. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयानं महाराष्ट्र आणि केरळ सरकारला कोरोना रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी निर्बंध लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. सध्या राजेश टोपे यांच्या वक्तव्यामुळं राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगात सुरु आहे. राज्यात सध्या 4 ते 5 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत.