Rajesh Tope : ‘सध्या राज्यात लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंध कायम असणार’
डेल्टा व्हेरिएंट (Delta Varient) जास्त घातक आहे. कारण या माध्यमातून रुग्णालयात दाखल होण्याचं, मृत्यूचं प्रमाण अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.
डेल्टा व्हेरिएंट (Delta Varient) जास्त घातक आहे. कारण या माध्यमातून रुग्णालयात दाखल होण्याचं, मृत्यूचं प्रमाण अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. तर दुसरीकडे ओमिक्रॉन(Omicron)चा वेग वाढत असल्याचंही ते म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर निर्बंध कठोर करण्याची आवश्यकता भासणार आहे. नागरिकांनी या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सध्या लॉकडाऊन नाही, निर्बंध कायम असणार, असं ते म्हणाले.