VIDEO : पुण्यातील Rajiv Gandhi Zoological Park आजपासून सुरु
पुण्यातील कात्रजची बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आजपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राण्यांना पाहण्याची संधी पुणेकरांसह पर्यटकांना मिळत आहे. यावेळी आशियाई सिंहासह, शेकरू, वाघाटी मांजर हे नवे प्राणी बघायला मिळणार आहेत.
पुण्यातील कात्रजची बाग अर्थात राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आजपासून सुरू झाले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे प्राणी संग्रहालय बंद होते. आता जवळपास दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्राण्यांना पाहण्याची संधी पुणेकरांसह पर्यटकांना मिळत आहे. यावेळी आशियाई सिंहासह, शेकरू, वाघाटी मांजर हे नवे प्राणी बघायला मिळणार आहेत. दरम्यान, पहिल्याच दिवशी पुणेकर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात आहे. शिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रवेश दिला जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे नागरिकांना बंधने होती. त्यात कात्रजच्या या बागेचाही समावेश होता.