Special Report | ‘चिवा’, ‘चंपा’ आणि टोपण नावाचा कल्ला!-TV9

| Updated on: Jan 21, 2022 | 10:41 PM

राणी बागेतील पेंग्विन आणि वाघांच्या इंग्रजी नावांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ आता भाजपच्या स्थायी समितीच्या सदस्या राजश्री शिरवाडकर यांनी या इंग्रजी नावावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: राणी बागेतील पेंग्विन आणि वाघांच्या इंग्रजी नावांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यापाठोपाठ आता भाजपच्या स्थायी समितीच्या सदस्या राजश्री शिरवाडकर यांनी या इंग्रजी नावावरून महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. महापौर आत्यांनीच पेंग्विनची इंग्रजी नावं ठेवली आहेत, असा टोला भाजप नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्या राजेश्री शिरवाडकर यांनी लगावला आहे.

महापालिकेतील दुर्मिळ प्राणी खरेदी करण्याच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी मिहीर कोटेचा यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या प्रसंगी राजेश्री शिरवाडकरही उपस्थित होत्या. मराठीच्या पाट्यावरून वाद सुरू असतानाच राणीच्या बागेतील प्राण्यांची इंग्रजी नावे ठेवण्यात आली आहे. त्याबाबत विचारले असता राजश्री शिरवाडकर यांनी थेट महापौरांवरच निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश महापौर आत्यांनीच केराच्या टोपलीत टाकला. एका प्राण्याचं नाव ऑस्कर ठेवलं ही कसली मराठी अस्मिता. मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश नाही तर फतवा काढला. पण त्यांच्या महापौर आत्यांनीच पेंग्विनची नाव इंग्रजी ठेवलीत, अशी खोचक टीका शिरवाडकर यांनी केली.

Special Report | Priyanka Gandhi यांच्या मनातलं ओठावर आलं?-TV9
Special Report | Nana Patole यांनी सांगितलेला हाच ‘तो’ गावगुंड मोदी