एक रकमी FRP देता येणार नाही, अप्पर सचिवांचं Raju Shetti यांच्या पत्राला उत्तर

| Updated on: Mar 21, 2022 | 8:12 PM

स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. एकरकमी एफ आर पी वरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक झाले आहेत.एफआरपी दोन टप्प्यातच देण्याची सहकार विभागाची भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे.

स्वाभिमानी विरुद्ध महाविकास आघाडी संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. एकरकमी एफ आर पी वरून राजू शेट्टी पुन्हा आक्रमक झाले आहेत.एफआरपी दोन टप्प्यातच देण्याची सहकार विभागाची भूमिका असल्याचं स्पष्ट झालं आहे. एक रकमी एफआरपी देता येणार नाही सहकार विभागाच्या अप्पर सचिवांनी राजू शेट्टी यांच्या पत्राला उत्तर देण्यात आलं आहे. रस्त्यावरची लढाई लढून एक रकमी एफआरपी द्यायला कारखानदारांना भाग पाडू  असं राजू शेट्टी म्हणाले.  वेळ प्रसंगी त्यांच्या नरड्यावर पाय देऊन एफआरपी वसूल करू, असा इशारा  राजू शेट्टींनी दिला आहे.

जे दुसरी Matoshree बांधतायत त्यांचं बांधकाम अधिकृत आहे का? Nitesh Rane यांचा सवाल
Pramod Sawant पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी