काही मिळो ना मिळो आंदोलन करतच राहणार, राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीला इशारा

| Updated on: Sep 04, 2021 | 1:02 PM

विधानपरिषदेच्या बारा जागांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा हे एक समझोता आहे. तो समझोता पाळायचा की नाही पाळायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे.

विधानपरिषदेच्या बारा जागांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा हे एक समझोता आहे. तो समझोता पाळायचा की नाही पाळायचा हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे. काही मिळो न मिळो आंदोलन करत राहणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. विधानपरिषेदची जागा हा मुद्दा गौण आहे. पूरग्रस्तांच्या मुद्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी विधानपरिषदेचा विषय पुढं आणला जातोय, असं राजू शेट्टी म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राज्य सरकारनं गेल्या वर्षी विधानपरिषदेच्या बारा जागांसाठी नावांची शिफारस केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप नावांना मंजुरी देण्यात आलेली नाही. विधानपरिषदेसाठी नाव वगळण्यात आलंय की नाही, यासंदर्भात माहिती नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागणीसाठी पंचगंगा परीक्रमा आयोजित करण्यात आलं आहे.

 

 

 

Published on: Sep 04, 2021 01:00 PM