स्वाभिमानीचे राजू शेट्टी ‘मविआ’त जाणार की नाही? थेट सांगितलं भेटीत नेमकं काय झालं?

| Updated on: Jan 02, 2024 | 4:04 PM

मविआकडून निवडणूक लढणार असेही म्हटले जात होते. यावर राजू शेट्टी यांनी थेट उत्तर दिलं आहे. राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मतोश्रीवर घेतलेली भेट ही राजकीय भेट नव्हती. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. अदानी संदर्भात ही भेट होती. उद्धव ठाकरे यांची अदानी उद्योग समुहाविरोधात लढाई सुरू आहे. त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होत असल्याचे त्यांनी म्हटले

मुंबई, २ जानेवारी २०२४ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्रीवर भेट घेतली. याभेटीच्या बातमीनंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी पक्षाकडून उभे राहणार असल्याची चर्चा सुरू होती. तर मविआकडून निवडणूक लढणार असेही म्हटले जात होते. यावर राजू शेट्टी यांनी थेट उत्तर दिलं आहे. राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरे यांची मतोश्रीवर घेतलेली भेट ही राजकीय भेट नव्हती. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली. अदानी संदर्भात ही भेट होती. उद्धव ठाकरे यांची अदानी उद्योग समुहाविरोधात लढाई सुरू आहे. त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा त्रास होत आहे. केंद्राच्या अदानींवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील ५ टक्के आयात शुल्क कमी केल्याने सोयाबीनला भाव नाही. २४ वर्षांनंतरही सोयाबीनचा भाव आज ही तसाच आहे. कारण मोठया प्रमाणात कच्चे तेल बाहेरून आयात झाले आहे तर ५ टक्के आयात शुल्क कमी झाल्याने हे परिणाम आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासह कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या १५ जानेवारीपासून आम्ही मराठवाडा दौरा करत आहोत. उद्धव ठाकरे यांची सुरू असलेली आदानी विरोधातील लढाई ही शेतकऱ्यांची आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

Published on: Jan 02, 2024 04:04 PM
केंद्राकडून वाहन कायद्यात बदल अन् ट्रक ड्रायव्हर थेट उतरले रस्त्यावर, काय आहे नवा हिट अँड रन कायदा?
… अन् फर्नांडीस कुटुंबाच्या संघर्षाचा विजय, अंजली दमानिया यांचा काय होता भुजबळांवर गंभीर आरोप?