Raju Shetti | महामंडळाचा वापर हात मारुन घेण्यासाठीच, मविआ आणि भाजपवर राजू शेट्टींचा निशाणा

| Updated on: Nov 09, 2021 | 11:58 PM

परभणी येथील गंगाखेड रस्त्यावर एसटी विभागीय कार्यशाळेसमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी राजू शेट्टी यांनी भेट दिली. यावेळी कर्मचार्‍यांच्या मागण्या त्यांनी ऐकून घेत संवाद साधला. आतापर्यंत ज्याने त्याने एसटी महामंडळाचा वापर हात मारुन घेण्यासाठीच केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असो की त्याआधीचे भाजपचे सरकार, दोन्ही सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

मुंबई : राज्यात आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी सुरु केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठींबा आहे. यापुर्वी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुर्ती न केल्याने कर्मचार्‍यांचा विश्वासघात झाला. केवळ राजकारण्यांच्या भ्रष्टाचारामुळेच एसटी महामंडळ तोट्यात गेले असा आरोप स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला. परभणी येथील गंगाखेड रस्त्यावर एसटी विभागीय कार्यशाळेसमोर सुरु असलेल्या बेमुदत उपोषणस्थळी राजू शेट्टी यांनी भेट दिली. यावेळी कर्मचार्‍यांच्या मागण्या त्यांनी ऐकून घेत संवाद साधला. आतापर्यंत ज्याने त्याने एसटी महामंडळाचा वापर हात मारुन घेण्यासाठीच केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असो की त्याआधीचे भाजपचे सरकार, दोन्ही सरकारने एसटी कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सरकार लोकप्रिय घोषणा करते आणि त्याचा बोजा लालपरीवर टाकते. त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही रकमेची तरतूद केली जात नाही. परिणामी एसटी तोट्यात गेली. लालपरीचे सर्वसामान्यांशी अतिशय जवळचे नाते असून आम्ही एसटीचा पास काढून शिक्षण घेतलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Nitesh Rane | राणे मंत्री झाले, राऊत खासदारकीमध्येच – नितेश राणे
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 November 2021