शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला; कृषी कायदे रद्दच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवे कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते, अखेर त्यांना त्याचे फळ आज मिळाले.