Raju Shetti | महाविकास आघाडीने विजयानंतर हुरळून जाऊ नये : राजू शेट्टी
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेत राज्यात ज्यांचं सरकार असतं त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे. यावरुन राज्याचं सार्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडीने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असे सूचक विधान राजू शेट्टी यांनी केले आहे.