गळाभेट, हातात-हात अन् थोडीशी कुजबुज, विधानभवनात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
राज्यसभेची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आज विधानभवनात अर्ज दाखल केले आहे.
मुंबई, 15 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सहा जागांसाठी महायुतीने पाच तर महाविकास आघाडीने एक उमेदवार जाहीर केला आहे. राज्यसभेची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्रातून सहा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत आज विधानभवनात अर्ज दाखल केले आहे. यावेळी विधानभवनाच्या आवारात शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गळाभेट घेतली. तर प्रफुल्ल पटेल यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना मिठी मारली. यासह देवेंद्र फडणवीस, भाई जगताप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातही हस्तांदोलन झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 15, 2024 04:14 PM