तुम्ही बिल्डरांचे गुलाम आहात; आरेमधील कारशेडवरून राखी सावंतची सरकारवर टीका
"सरकार काय करतेय तेच समजत नाहीये. या बिल्डरांच्या तळव्याखाली का बसली आहे? जनतेला तुम्ही दाखवता की तुम्ही किती साधेसरळ आहात, पण तुम्ही बिल्डरांचे गुलाम आहात," असं राखी म्हणाली.
“सरकार काय करतेय तेच समजत नाहीये. या बिल्डरांच्या तळव्याखाली का बसली आहे? जनतेला तुम्ही दाखवता की तुम्ही किती साधेसरळ आहात, पण तुम्ही बिल्डरांचे गुलाम आहात? आरेला विकू नका. हे आमचं आरे आहे, पर्यावरणाला हानी पोहोचली तर काय होईल याचा विचार तुम्ही करा. काही ना काही कारणं सांगून तुम्ही आधीच 3 हजार झाडं कापली आहेत. आज मुंबई आरेच्या जंगलामुळे टिकली आहे,” अशा शब्दांत अभिनेत्री राखी सावंतने संताप व्यक्त केला. आरेमध्ये मेट्रो कारशेडबाबत ती बोलत होती. आरेमध्ये होत असलेल्या आंदोलनातही तिने सहभाग घेतला.
Published on: Jul 07, 2022 02:27 PM