शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही, सोमय्या प्रकरणावरुन रक्षा खडसे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे, असं खडसे म्हणाल्या.
खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे. एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना पुण्यामध्ये ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आहे आणि त्यांचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतलं जाणार नाही, अशा इशारा खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.