बीडच्या १०० एकरात पुन्हा घुमणार जरांगे पाटील यांचा आवाज, इशारा सभेतून कोण असणार टार्गेटवर?
23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आलीय. बीडपासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर ही सभा होणार. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार
बीड, १७ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासंदर्भात 24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा आयोजित करण्यात आलीय. बीडपासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर ही सभा होणार आहे. सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकर परिसरात ही सभा होणार आहे. 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मनोज जरांगे पाटील यांची ही इशारा सभा होणार आहे. या सभेतून जरांगे पाटलांचा इशारा नेमका सरकारला काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 24 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटमच्या पूर्वीची ही शेवटची सभा असणार आहे. 100 एकर परिसरात होणाऱ्या जाहीर सभेकरता बीडमधील मराठा समाजाचे कार्यकर्ते समन्वयक तयारीला लागले आहे. तर या दिवशी वाहतुकीचा कोणताही खोळंबा व्हायला नको, म्हणून तशी वाहतूक व्यवस्था देखील करण्यात येणार आहे.