‘चोर आले, ५० खोके घेऊन किती बघा’, रॅप साँग करणाऱ्या तरुणाला अटक, राष्ट्रवादीच्या नेत्यानं काय केलं ट्विट?
VIDEO | राम मुंगासे या कलाकाराच्या अटकेमुळे पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघाले तर या अटकेने विरोधकांनी शिंदे गटावर साधला जोरदार निशाणा
छत्रपती संभाजीनगर : पन्नास खोके घेऊन किती चोर आले, कसे ओके होऊन चोर आले अशा चालीत रॅप साँग करून सोशल मीडियावर धूमाकूळ घालणाऱ्या नवोदित कलाकाराला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. राम मुंगासे याच्या रॅप साँगमध्ये राजकीय टीका टिप्पणी केली असली तरी त्यामध्ये कोणत्याही पक्षाचे अथवा कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव घेण्यात आले नाही. राम मुंगासे या कलाकाराच्या अटकेमुळे आता आणि पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.पोलिसांनी त्याला अटक करण्यात आल्याने विरोधकांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मुंगासे याचा व्हिडीओ ट्विट करत त्यांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले आहे.
Published on: Apr 06, 2023 07:23 PM