Ramadan Eid 2024 : देशभरात रमजान ईदचा उत्साह, नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची गर्दी

| Updated on: Apr 11, 2024 | 9:49 AM

रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळ पासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदच नमाज पठण करण्यात येत आहे.

ईद-उल-फित्र अर्थातच रमजान ईद देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. आज सकाळ पासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदच नमाज पठण करण्यात येत आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या सुन्नी जामा मशीदच्या बाहेर मोठ्या संखेने मुस्लिम बांधव हे नमाज पठणासाठी एकत्रित आले आले आहेत तर दुसरीकडे रमजान ईदच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई पोलिसांनी खबरदारी बाळगली आहे आणि आज मुस्लिम बांधवांकडून अतिशय उत्साहात रमजान ईद हा साजरा होताना पाहायला मिळत आहे. बीडमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी होत असून इदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अदा केली जात आहे. मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली असून ईदनिमित्त शुभेछा देण्यासाठी अनेक नेते उपस्थित झालेत. शिवसंग्रामच्या ज्योति मेटे, वंचितचे अशोक हिंगे पाटील, रीपाईचे पप्पू कागदे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्यात. तर परभणी शहरातील प्रमुख ईदगाह असलेल्या जिंतूर रोड स्थित ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी एकवटलेले पाहायला मिळतात. असाच उत्साह संभाजीनगर, सोलापूर आणि इतर शहरात दिसतोय.

Published on: Apr 11, 2024 09:49 AM
नाना पटोलेंच्या कारला अपघात, थोडक्यात बचावले; ‘त्या’ रात्री दीड वाजता नेमकं काय घडलं
लोकं मला नोट पण देतात अन् वोट पण… निलेश लंकेंच्या मिश्किल वक्तव्याची चर्चा