रामभक्तांसाठी आनंदाची बातमी, अयोध्येतील राम मंदिरात आता रामायण पाहता येणार, पण कसं?

| Updated on: Jan 07, 2024 | 2:04 PM

अयोध्येच्या राम मंदिरात मूर्तीच्या माध्यमातून राम भक्तांना रामायण पाहायला मिळणार आहे. अयोध्येतील कथाकुंज या कार्यशाळेत १३ वर्षापासून रामायणातील पात्रांच्या मूर्त्या बनवण्याचं काम सुरु आहे. अयोध्येतल्या राम कथा कुंज परिसरात या रामकथा निर्माणाच काम सध्या जोरदार सुरु आहे.

अयोध्या, ७ जानेवारी २०२४ : रामभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अयोध्येतील राम मंदिरात आता रामायण पाहायला मिळणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरात मूर्तीच्या माध्यमातून राम भक्तांना रामायण पाहायला मिळणार आहे. अयोध्येतील कथाकुंज या कार्यशाळेत १३ वर्षापासून रामायणातील पात्रांच्या मूर्त्या बनवण्याचं काम सुरु आहे. अयोध्येतल्या राम कथा कुंज परिसरात या रामकथा निर्माणाच काम सध्या जोरदार सुरु आहे. अयोध्येतील कथाकुंज या कार्यशाळेत आसामचे मूर्तीकार रणजित मंडल हे रामायणातील पात्रांच्या मूर्त्या सुबकरित्या साकारत आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत बहुप्रतिक्षित अशा रामलल्लाचं भव्य दिव्य मंदिराचं लोकार्पण होणार असल्याने सर्वच राम भक्तांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा दिवस जसजसा जवळ येतोय तसे यासोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्यास सुरूवात होतांना दिसतये.

Published on: Jan 07, 2024 02:04 PM
बच्चा है… दिल है साफ, नफरत से…, रोहित पवार यांचा अजित पवार यांना टोला काय?
दादा सीनियर सिटीजन नाऊ, सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना काय लगावला टोला?