Thane | बाबरी मशीद ते अयोध्या… 26 विविध रांगोळ्यांमधून प्रभू श्रीरामाचं उलगडलं चरित्र

| Updated on: Jan 20, 2024 | 11:15 PM

22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास तसेच रामायण आणि अध्यात्मावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात बाबरी मशिदीपासून ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्ररूपात साकारण्यात आले आहे.

ठाणे, २० जानेवारी २०२४ : ठाण्यात गावदेवी मैदानात रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या या महोत्सवामध्ये राम मंदिराचा इतिहास तसेच रामायण आणि अध्यात्मावर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात बाबरी मशिदीपासून ते राम मंदिरापर्यंत विविध टप्पे चित्ररूपात दाखवण्यात आले आहेत. मात्र सर्वात जास्त आकर्षण इथे रेखाटण्यात आलेल्या रांगोळ्यांचे आहे. 26 विविध रांगोळ्यांच्या माध्यमातून रामायणातील महत्त्वाचे प्रसंग हुबेहूब साकारण्यात आले आहेत. बारा कलाकारांनी तीन दिवस मेहनत करून या रांगोळ्या काढल्या आहेत. यामध्ये एक रांगोळी ही अति भव्य असून त्यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरचे चित्र काढण्यात आले आहे. बघा बाबरी मशिदीपासून ते राम मंदिरापर्यंतचे विविध टप्पे रांगोळीच्या स्वरूपात…

Published on: Jan 20, 2024 11:15 PM
प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर?
Ayodhya Ram Mandir | अवघे काही तास… राम मंदिर रंगेबेरंगी फुलांनी सजलं, बघा कसा आहे माहोल?