एका बाजूला भोंगे, दुसऱ्या बाजूला सोंगे; नागपुरात रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका
एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहे, अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. भोंगे अनेक वर्षांपासून आहे. राज ठाकरे यांनी मंदिरात भोंगे लावावे. पण दोन धर्मात तणाव निर्माण करु नये. राज ठाकरे यांनी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्याचा रंग बदलला. राज्य सरकारने सांगितले परवानगी घेऊन भोंगे लावावे. राज ठाकरे (Raj Thackeray) हे मोठे नेते आहेत. पण, आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशात पेशवाई नाही, हे लक्षात ठेवावे. तुम्हाला भोंगे लावायचे तर लावा, असंही रामदास आठवले म्हणाले.
Published on: Apr 19, 2022 02:08 PM