Chatrapati Sambhaji Raje यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेणार – Ramdas Athavale
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते.मी 2 मार्चला आजाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार, असल्याचेही आठवले म्हणाले आहेत.
आठवलेंनी छत्रपती संभाजीराजेंच्या उपोषणावरही भाष्य केलंय. मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे. संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला होता. महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केले होते.मी 2 मार्चला आजाद मैदानात त्यांच्या आंदोलनाला भेट देणार, असल्याचेही आठवले म्हणाले आहेत. उद्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायती समोर तर शहरात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच मागण्या मान्य होईपर्यत मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्याचा इशारा तुळजापूरचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिला आहे. ठाकरे सरकार प्रत्येक अर्थाने गद्दार निघाले असून, आश्वासने पाळली नाहीत. राज्य सरकारमधील मंत्र्यांची हिम्मत असेल तर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन दाखवावे, जिल्ह्यात आलात तर प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा पाटील यांनी दिला.सत्ताधारी, लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावावी असेही ते म्हणाले.