जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? ‘त्या’ कृतीवरून संताप, कुणी केली अटकेची मागणी?
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या कृतीनंतर त्यांनी जनतेची माफीही मागितली. मात्र यानंतरही रामदास आठवले यांच्यापासून ते भाजपच्या नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होतो तो त्यांनी फाडल्याचा आरोप विरोधकांनी केला.
मनुस्मृती जाळण्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी कृती घडली. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या कृतीनंतर त्यांनी जनतेची माफीही मागितली. मात्र यानंतरही रामदास आठवले यांच्यापासून ते भाजपच्या नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. महाड येथे जितेंद्र आव्हाड यांच्या हातून जे काही घडलंय त्यावरून संताप उमटणं सुरू झालंय. शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांच्या समावेशाच्या प्रस्तावावरून महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्याचवेळी मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होतो तो त्यांनी फाडल्याचा आरोप विरोधकांनी केला. बघा काय केला विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल?