Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण

| Updated on: Nov 26, 2024 | 2:04 PM

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “भाजप म्हणते की आमच्याकडे आमदारांचं संख्याबळ जास्त आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. असा संदेश भाजपच्या हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या बंपर विजयानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? हे अद्याप कोडं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन तीन दिवस उलटले, तरी मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपने ठरवले आहे, असं मोठं वक्तव्य केलं. इतकंच नाहीतर एकनाथ शिंदे यांना तसा संदेश भाजपने दिलाय, असेही म्हटले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, “भाजप म्हणते की आमच्याकडे आमदारांचं संख्याबळ जास्त आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. असा संदेश भाजपच्या हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आलं पाहिजे. त्यांनी दिल्लीत योगदान दिलं पाहिजे, असे मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, “शिंदे आणखी एक टर्म मागत आहेत. मात्र भाजप यासाठी तयार नाही. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न वापरण्यात येणार नाही. तिथले सूत्र वेगळे होते. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमार यांना आधीच मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. परंतु येथे असे कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. महाराष्ट्रात महायुती एकत्र राहणे हे आपल्या फायद्याचे असून ते विकासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या नावाला पाठिंबा द्यावा आणि लवकरात लवकर सत्ता स्थापन करावी, असेही ते म्हणाले.

Published on: Nov 26, 2024 02:04 PM
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? फडणवीस की शिंदे? भाजपच्या बड्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण? उत्सुकता शिगेला असताना ‘रामगिरी’वर पुन्हा शिंदेंच्या नावाची लागली पाटी