मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्या वादात रामदास आठवले यांची उडी, म्हणाले…

| Updated on: Jan 15, 2024 | 4:37 PM

मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वादात आता मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावर भाष्य करत रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांनाही भेटून समजवणार असल्याचे म्हटले आहे.

Follow us on

वाशिम, १५ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वादात आता मंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावर भाष्य करत रामदास आठवले यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोघांनाही भेटून समजवणार असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मात्र त्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळा प्रवर्ग बनवून आरक्षण द्यावं, त्यांना पंधरा टक्के आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी आरक्षणावर भाष्य करताना म्हटले. तर ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज बहुजन समाज आहेत आणि त्यामुळे या दोन्ही समाजात भांडण लावण्याचे काम होऊ नये यासाठी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ या दोघांनाही भेटून समजवणार असल्याचे सुद्धा रामदास आठवले यांनी सांगितले.