संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांना अश्लील शिव्या घातल्या, शिवसेनेच्या नेत्यानं घणाघाती टीका करत केला मोठा गौप्यस्फोट
VIDEO | संजय राऊत शिवसैनिक नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक करताय, शिवसेनेच्या नेत्याचा संजय राऊत यांच्यावर काय केला हल्लाबोल?
रत्नागिरी : संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत प्रसिद्धी मिळवण्यासाठी सर्व कारस्थान करत आहे. सामना वृत्तपत्राच्या संपादक पदी रश्मी ठाकरे यांच्या नियुक्ती प्रसंगी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिव्या दिल्यात, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठी तसेच स्वतःची सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राऊत यांनी हे कारस्थान केल आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. मी आजपर्यंत संजय राऊत यांच्यावर कधीच टीका केली नव्हती , मात्र आता डोक्यावरून पाणी जात आहे, आता यावर बोलावंच लागेल, असं वक्तव्य कदम यांनी केलं असून संजय राऊत यांना इशारा दिला आहे.