खेडमधून आरोपांचा ‘गोळीबार’, एकीकडे ठाकरे-शिंदे तर दुसरीकडे जाधव-कदम; बघा खंडाजंगी

| Updated on: Mar 19, 2023 | 11:43 PM

VIDEO | खेडच्या सभेनिमित्त पुन्हा एकदा रामदास कदम आणि भास्कर जाधव आमने सामने, इतकेच नाही तर दोघांमधील टीकेचा स्तरही खालावला, बघा टीव्ही ९ मराठीचा रिपोर्ट

मुंबई : रत्नागिरीच्या खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जाहीर सभा झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या त्याच मैदानावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. मात्र शिवसेनेच्या या जाहीर सभेपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यात आरोपांच्या फैरी झाडत असल्याचे पाहायला मिळाले. खेडच्या सभेनिमित्त पुन्हा एकदा रामदास कदम आणि भास्कर जाधव आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. नुसतेच आमने-सामने नाहीतर त्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचा स्तर देखील घसरल्याचे पाहायला मिळत असून जाधव कदम यांच्यामध्ये एकमेकांना गाडण्याचं आव्हान देण्यापर्यंत पोहोचले आहे.

Published on: Mar 19, 2023 11:43 PM
पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करा अन्…, गजानन किर्तीकर यांची घणाघाती टीका
जैन धर्मियांमधील दोन पंथात तुफान राडा, श्वेतांबर आणि दिंगबर आमने-सामने; नेमकं काय घडलं?