Vidhan Parishad LIVE | वैभव खेडेकर हल्ला प्रकरणावर रामदास कदम आक्रम, विधासभेचं कामकाज लाईव्ह

| Updated on: Dec 24, 2021 | 2:44 PM

शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी थेट आपल्याच सरकारवर आज विधानपरिषदेत हल्लाबोल केला. मनसेचे नेते आणि खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना ताबडतोब निलंबित करा. नाही तर कोर्टात जाईल, असा इशाराच रामदास कदम यांनी दिला आहे. रामदास कदम यांनी आपल्याच सरकारवर टीका केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रामदास कदम यांनी आज विधान परिषदेत खेड नगरपरिषदेतील भ्रष्टाचारावरून थेट ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. नगराध्यक्षाने नगरपालिकेत अनेक भ्रष्टाचार केले. 20 प्रस्ताव केले. त्यांना अपात्र करण्यासाठी 50 टक्के नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला. 20 पैकी 11 मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने 15 दिवसात त्यांना अपात्र केलं पाहिजे. पण दोन महिने झाले प्रस्ताव राखून ठेवला. त्यांना अपात्र केलं जात नाही. 11 मुद्द्यावर भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं आहे. त्यांना पाठिशी का घालता? ते तुमचे जावई आहेत का? असा सवाल कदम यांनी केला.

Mumbai Restriction | मुंबईतील चौपाट्यांवर रात्रीची जमावबंदी लागू, सूत्रांची माहिती
Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 24 December 2021