‘स्वतःच्या बापाच्या विचाराशी गद्दारी केली अन्….’, रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
VIDEO | रामदास कदम यांनी मालेगावातील उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून जोरदार हल्ला, बघा काय केली टीका
रत्नागिरी : रामदास कदम यांनी मालेगावच्या उद्धव ठाकरे यांच्या सभेवरून जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्याने ते दुखावले गेले आहेत. ज्यांनी मुख्यमंत्रीपद घालवलं त्या 40 आमदारांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे. गद्दार कोण याचा फैसला महाराष्ट्र करेल. आपल्या बापाच्या विचाराशी गद्दारी करणारे इतरांना गद्दार कसे म्हणू शकतात? बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे का? गद्दारीचा शिक्का तुमच्या कपाळावरून जाणार नाही. कितीही भाड्याने लोकं आणून बोंबलला तरी तुमच्या कपाळावरील गद्दारीचा शिक्का जाणार नाही, असं रामदास कदम म्हणाले. ते असेही म्हणाले की, भगवा झेंडा हातात घेण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहे. भगव्याचे शिपाई आम्ही आहोत. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री बनलात. त्या दिवशी तुम्ही भगव्याचा अधिकार गमावलाय. धनुष्यबाणाचा अधिकार गमावलाय. शिवसेनेचा अधिकार गमावलाय. तुम्ही कितीही उसनं अवसान आणून बोलला तरी तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असं त्यांनी सांगितलं.