VIDEO : Ramdas Kadam | रामदास कदमांना विधानभवानात ‘नो एन्ट्री’, पोलिसांना गेटवरच अडवलं
शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आज विधानभवनात आले होते. मात्र, त्यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आलं.
शिवसेना नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आज विधानभवनात आले होते. मात्र, त्यांना विधानभवनात जाण्यापासून रोखण्यात आले आहे. आरटीपीसीआर चाचणी केली नसल्याने कदम यांना पोलिसांनी आत प्रवेश दिला नाही. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आलं. रामदास कदम आज विधीमंडळ कामकाजासाठी आले होते. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील तसेच शिवसेनचे आमदार त्यांना गेटवर आणण्यासाठी गेले. त्यावेळी रामदास कदम याची अटीजेंन टेस्ट करून त्यांना सोडण्यात आले.