दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; आदित्य ठाकरे अन् रामदास कदमांमध्ये जुंपली
रामदास कदम यांच्या बंधूंनी एका स्थानिक पत्रकाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. दिशा सालियन प्रकरणात रामदास कदम यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आदित्य ठाकरेंना फटके मारण्याचं विधान केलं. तर दुसरीकडे एकमेकांना तुरूंगात टाकण्याचा इशारा देत आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सुरू असून दापोलीत दादागिरीवरून एकमेकांना इशारे-प्रतिइशारे देणं सुरू आहे. अशातच रामदास कदम यांच्या बंधूंनी एका स्थानिक पत्रकाराला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. दिशा सालियन प्रकरणात रामदास कदम यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आदित्य ठाकरेंना फटके मारण्याचं विधान केलं. तर दुसरीकडे एकमेकांना तुरूंगात टाकण्याचा इशारा देत आव्हान-प्रतिआव्हान दिलं जातंय. त्यातच दादागिरीच्या आरोपांमध्ये रामदास कदम यांच्या व्हिडीओची भर पडली आहे. आरोपांनुसार शिंदे गटाचे नेते ठाकरे गटाने लावलेल्या मशालीचे स्टिकर काढत होते. हेच चित्रीकरण स्थानिक पत्रकार करत असताना रामदास कदम यांचे भाऊ अरूण कदम यांनी त्याला दमदाटी करत शिवीगाळ केली. धक्कादायक म्हणजे पत्रकाराला मारहाण केल्यानंतर अरूण कदम घरी परतत असताना त्यांच्या बाजूचा एक मोबाईल चालू राहिला त्यात पुढचा संवाद रेकॉर्ड झाला. त्यात पोलिसांनी मारहाण केलेल्या पत्रकाराची तक्रार घेऊ नये, पत्रकाराने शिवीगाळ केली म्हणून त्याला मारहाण झाली असं सांगा, असा संवाद रेकॉर्ड झालाय.