उपभोगण्याची वस्तू म्हणून वापर अन् लोखंडी रॉडने मारहाण; भाजपाच्या रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप

| Updated on: Apr 11, 2024 | 4:43 PM

स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न करून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळा जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले, रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचे गंभीर आरोप...बघा काय म्हणाल्या?

भाजपाने रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, “स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न करून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळा जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले” , असा घणाघाती आरोप त्यांनी केला. “एक खासदार म्हणून असं सांगितलं जातं की, डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी जायच कुठे? प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. मी त्यांच्या घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. ज्या फ्लॅटवर मी या बाळाला घेऊन राहायची तोही त्यांनी विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलंय आणि मला घराबाहेर का काढलं?” असा सवाल पूजा तडसने यांनी केला.

Published on: Apr 11, 2024 03:46 PM
मुंबईतील जागावाटपावरून वर्षा गायकवाड यांच्याकडून नाराजी; म्हणाल्या, आमचं म्हणणं आम्ही मांडलं…
त्यात माझी काय चूक? सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट