26/11 च्या हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण, हल्ल्यातील शहिदांना कुणी-कुणी वाहिली मानवंदना?

| Updated on: Nov 26, 2023 | 1:29 PM

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात या शहीदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते

Follow us on

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : मुंबईत झालेल्या २६/११ च्या घटनेला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलीस दलातील जे शहीद झालेत त्यांना मानवंदना देण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी आणि जवानांच्या स्मरणार्थ मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात या शहीदांना मानवंदना देण्यात आली. पोलीस स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तर पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते.