रामगिरी महाराजांची सुरक्षा तुटपुंजी, त्यांना झेड प्लस सुरक्षा द्या; कोणी केली मागणी?

| Updated on: Aug 20, 2024 | 1:58 PM

रामगिरी महाराजांना दिलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी तसेच रामगिरी महाराजांचे वक्तव्य वादग्रस्त नसून ते वादग्रस्त ठरवण्याचा काही जणांनी प्रयत्न केलाय अशा लोकांचा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ यांनी निषेध व्यक्त केलाय.

रामगिरी महाराजांना देण्यात आलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून करण्यात आली आहे. ‘रामगिरी महाराजांचे वक्तव्य हे वादग्रस्त नसून ते वादग्रस्त बनवण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आहे, असे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष, ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ यांनी म्हटले तर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा विरोध करणाऱ्या लोकांचा प्रकाश महाराज जवंजाळ यांनी निषेध व्यक्त केला आहे. रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरांबाबत केलेले वक्तव्य सत्य आहे. हे सत्य समाजासमोर मांडण्याचा अधिकार महाराज मंडळींना आहे, असे प्रकाश महाराज जवंजाळ यांनी म्हटले आहे. तर रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचे महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून समर्थन करण्यात आले असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणीही कऱण्यात आली आहे.

Published on: Aug 20, 2024 01:58 PM
बदलापुरकरांचा संताप अनावर, रेल्वे रूळावर उतरलेल्या नागरिकांकडून पोलिसांवरच दगडफेक; आंदोलकावर लाठीचार्ज
‘लाडक्या बहिणीं’च्या छोट्या मुली…’, बदलापूर घटनेवरून उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला