Ramraje Nimbalkar Video : ‘त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा…’, रामराजे निंबळकरांचा रोख कोणावर?

| Updated on: Mar 17, 2025 | 4:38 PM

साताऱ्यात बोलत असताना माजी सभापती रामराजे नाईक निंबळकर यांनी रणजीत निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असल्याचे पाहायला मिळाले.

‘त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा मारेल’, असं वक्तव्य करत माजी सभापती रामराजे नाईक निंबळकर यांनी नाव न घेता रणजीत निंबाळकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. सांगोला जिल्ह्याला पाणी दिलं आणि हे माझेच पुतळे जाळायला लावतात, असंही रामराजे नाईक निंबळकर म्हणाले. साताऱ्यात बोलताना रामराजे नाईक निंबळकर यांनी रणजीत निंबाळकर यांच्यासारखे हावभाव करत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे पाहायला मिळाले. ‘सांगोल्याला पाणी द्या म्हणतोय, काय घेणं देणं आहे आम्हाला… ‘सांगोल्याला पाच ठिकाणावरून पाणी येतंय. सांगोल्याला दुष्काळात पाणी सोडणारा मी आहे आणि माझे पुतळे जाळले जाताय.’, असं रामराजे नाईक निंबळकर यांनी म्हटलंय.

Published on: Mar 17, 2025 04:38 PM
Ajit Pawar News : तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; लाडकी बहीणवरून अजितदादांचा विरोधकांना जोरदार टोला
Nashik Protest : औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन