Narayan Rane, Nitesh Rane यांना दिलासा मात्र Pravin Darekar यांना टेंशन
दिंडोशी सेशन कोर्टात नुकताच राणे पिता-पुत्राला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करीत असताना काही अटी आणि शर्टी ठेवल्या असल्याचे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच नितेश राणे यांनी न्यायालयाचे देखील आभार मानले आहेत.
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (nitesh rane) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. राणे पिता-पुत्रा विरोधात दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिंडोशी (dindoshi) सेशन कोर्टात नुकताच राणे पिता-पुत्राला जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने जामीन मंजूर करीत असताना काही अटी आणि शर्टी ठेवल्या असल्याचे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच नितेश राणे यांनी न्यायालयाचे देखील आभार मानले आहेत. लोकशाहीमध्ये आम्हा लोकप्रतिनिधींना जे काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकारांचं आम्ही पालन करतो. कोणा विरोधात अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करतो. ते अधिकार न्यायालयाने कायम ठेवले त्यासाठी न्यायालयाचे मी आभार मानतो असं नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.