Special Report | राणे पिता – पुत्र अडचणीत..कोकणात राजकीय घमासान
दोन शिवसैनिकांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात लेखी तक्रार करणारे पत्र पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि राणे आमनेसामने आले आहेत.
सिंधुदुर्ग : नितेश राणे यांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत, त्यावरून त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही नोटीस बजावली आहे. दोन शिवसैनिकांनी पोलिसात नारायण राणे यांच्याविरोधात लेखी तक्रार करणारे पत्र पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे हा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. यावरून पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि राणे आमनेसामने आले आहेत, हा सत्तेचा अहंकार असल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर पोलीस त्यांचे काम करत आहेत, त्यात सरकारचा कसलाही हस्तक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीतील नेते देत आहेत.