Narayan Rane | मुख्यमंत्र्यांबाबत राणेंचं वादग्रस्त वक्तव्य, राणेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

| Updated on: Aug 24, 2021 | 8:21 AM

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबई आणि कोकण पट्टा पिंजून काढणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आता राणेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

Published on: Aug 24, 2021 08:21 AM
Mumbai | मुंबईत शिवसेना आक्रमक, नारायण राणेंविरोधात कोंबडी चोरची बॅनरबाजी
Pramod Jathar | नारायण राणेंना उत्तर द्यायचं असेल तर ठाकरी भाषेत उत्तर द्या : प्रमोद जठार