Ranganath Pathare | Part 2 | ”बरेच लेखक सार्वजनिकपणे एक बोलतात आणि खासगीत वेगळंच बोलतात”

| Updated on: Sep 06, 2021 | 5:34 PM

ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी काही मराठी लेखक हे सार्वजनिक मंचावर एक भूमिका घेतात आणि खासगीत वेगळंच बोलतात असं निरिक्षण नोंदवलं आहे. हे सांगताना त्यांनी त्यांच्या लेखक म्हणून सुरुवातीच्या दिवसात ज्येष्ठ लेखकांच्या बैठकींमधील काही अनुभवही मांडले.

ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी काही मराठी लेखक हे सार्वजनिक मंचावर एक भूमिका घेतात आणि खासगीत वेगळंच बोलतात असं निरिक्षण नोंदवलं आहे. हे सांगताना त्यांनी त्यांच्या लेखक म्हणून सुरुवातीच्या दिवसात ज्येष्ठ लेखकांच्या बैठकींमधील काही अनुभवही मांडले. ते म्हणाले, “मला सुरुवातीच्या काळात लेखकांच्या घोषित आणि अघोषित गोष्टी बघायला मिळाल्या. लेखक बाहेर कसे बोलतात आणि खासगीत कसे बोलतात हे पाहिलं. लेखकांची सार्वजनिक आणि खासगीतील भूमिका पाहून मी गोंधळून गेलो आणि हे ठिक नसल्याचं जाणवलं. वरिष्ठ लेखकांच्या बैठकींमधून ग्रामीण भागातील लेखकांना काय मिळणार हे कळायचं नाही. त्यामुळे वरिष्ठ लेखकांच्या बैठका त्यांचं स्वतःचं प्रस्थ वाढवण्यासाठी आहेत का असा प्रश्न पडायचा.” | Ranganath Pathare criticize writer who take different stands in publicly and in personal meeting