म्हणून मला खासदार व्हावं लागलं, नाव न घेता शरद पवारांवर रणजितसिंहांचं टीकास्त्र

| Updated on: Apr 02, 2024 | 1:16 PM

जे नेते तुतारी तुतारी करून फिरतायात ते माढा लोकसभेचे खासदार झाले आणि या माणसाने प्रश्न कधीच मिटून दिले नाहीत, असं वक्तव्य करत शरद पवार यांचे नाव न घेता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमका काय केला हल्लाबोल?

जे नेते तुतारी तुतारी करून फिरतायंत त्या तुतारीचे नेते याठिकाणी लढले होते. पाच वर्षे ते या माढा लोकसभेचे खासदार होते. या मातीतून खासदार झाले आणि त्यांनी काम मात्र इमान इतबारे बारामती लोकसभेचे केले. एवढा मोठा नेता याठिकाणी खासदार होतो म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं होतं, की देशाचा नेता या ठिकाणावरून निवडणूक लढवत आहे. आम्हाला वाटलं होतं की आमचे रेल्वेचे प्रश्न सुटतील, पाण्याचे प्रश्न सुटतील, प्रश्न सुटायचे राहिले पण या माणसाने प्रश्न कधीच मिटून दिले नाहीत आणि ते मिटवायला 2019 सालं यावं लागलं आणि मला खासदार व्हावं लागलं, असं वक्तव्य करत नाव न घेता अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांच्यावर भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शिवसेना ( शिंदे गट ) यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या करमाळयातील बैठकीत बोलताना टीका केली आहे.

Published on: Apr 02, 2024 01:16 PM
साडे 17 रुपयांची साडी अन्… बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर निशाणा काय? महायुतीत कुरघोडी सुरूच
अमोल कोल्हेंना ‘त्या’ चंदेरी दुनियेची आठवण करुन आढळरावांनी सुनावले खडेबोल