रणजितसिंह डिसले रजा प्रकरणामुळं राजीनामा देण्याच्या मनस्थितीत
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि उस्मानाबाद राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी याबाबत टीव्ही 9 ला स्वतः माहिती दिली आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) आणि उस्मानाबाद राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून डिसले यांनी याबाबत टीव्ही 9 ला स्वतः माहिती दिली आहे. रणजितसिंह डिसले आणि आणि प्रशासनातील वाद आणखी पेटणार असल्याचं चित्र आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांनी प्रतिनियुक्तीवर गैरहजर असलेल्या डिसले गुरुजींनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला? त्यांनी फक्त अर्ज केला आहे त्या सोबतची कागदपत्रे नव्हती. परवानगी साठी ते थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेले.योग्य प्रस्ताव आल्यास रजा द्यायला काही अडचण नाही, अशी भूमिका देखील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी म्हटलं आहे. याशिवाय राजीनामा द्यायचं कारण काय? राजीनामा देणारा माणूस आधीच सांगत नाही, असं देखील किरण लोहार म्हणाले आहेत.