माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीची बैठक, रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे फडणवीसांच्या भेटीला
णजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट... रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढ्याचे उमेदवार आहेत. अजित पवार गट आणि भाजपमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते यांच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात सध्या बैठक सुरू आहे. माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीची बैठक सुरू असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे माढ्याचे उमेदवार आहेत. अजित पवार गट आणि भाजपमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण व्हावे यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. धैर्यशील मोहिते यांच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. धैर्यशील मोहिते यांनी कालच भाजप या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार गटाकडून माढा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर रणजित सिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहे. तर दुसरीकडे युती धर्म पाळा, अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित दादांची पदाधिकाऱ्यांसोबत देवगिरीवर बैठक झाली. याबैठकीला रामराजे निंबाळकर, दीपक चव्हाण हे हजर होते.