रावसाहेब दानवेंकडून हिरवा झेंडा, 1800 प्रवाशांसह ‘मोदी एक्प्रेस’ कोकणाकडे रवाना

| Updated on: Sep 07, 2021 | 1:03 PM

चाकरमान्यांना घेवून गणेशोत्सवासाठी मोदी एक्सप्रेस कोकणाच्या दिशेने मार्गस्थ झालीय. 1800 चाकरमान्यांना घेवून गणेशोत्सवासाठी ही ट्रेन दादरहून रवाना झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला.

मुंबई: चाकरमान्यांना घेवून गणेशोत्सवासाठी मोदी एक्सप्रेस कोकणाच्या दिशेने मार्गस्थ झालीय. 1800 चाकरमान्यांना घेवून गणेशोत्सवासाठी ही ट्रेन दादरहून रवाना झाली. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवला. दादर वरून मोदी एक्स्प्रेस रवाना होताच रेल्वे मधील चाकरमान्यांनी एकच बाप्पाचा जयघोष केला. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत हजारो चाकरमान्यांनी जल्लोष केला. टिव्ही ९ ची टिम सुद्धा या मोदी एक्स्प्रेसमधून या चाकरमान्यांसोबत प्रवास करतेय. दादरहून ही ट्रेन रवाना होताना भाजपचे विविध नेते उपस्थित होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यासह इतर नेते देखील उपस्थित होते. नितेश राणे यांनी कोकणात भाजपचा एक आमदार आहे. हा आमदार काय करुन दाखवू शकतो, हे आज स्पष्ट झाल्याा टोला शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यावर IAS-IPS अधिकारी मंत्र्यांवर आरोप करतात, नवाब मलिकांचा गंभीर आरोप
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 September 2021