स्पेशल रिपोर्ट : दाजींचे कार्यकर्ते दिल्ली दरबारी, रावसाहेब दानवेंकडून खास सोय!

| Updated on: Aug 06, 2021 | 12:45 PM

रावसाहेब दानवेंना भेटण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांची रीघ लागली.. आता त्यांची सोय कशी केली जाते हे खुद्द दानवेंच तुम्हाला दाखवतील.. बरं एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना दिल्लीबद्दल काय वाटतंय हे स्वत: रावसाहेब दानवेच सांगतायेत..ऐका 

दाजी….दाजी म्हंटलं की आपसुकच रावसाहेब दानवे यांचा (Raosaheb Danve) चेहरा समोर येतो ….दाजीं आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत.. मात्र कार्यकर्त्यांच्या घोळक्यात राहणं ते अजूनही पसंद करतात.. आता मंत्रिपदावर वर्णी झाल्यानंतर मोदीजींनी फतवा काढला की 15 ऑगस्टपर्यंच मंत्र्यांना दिल्लीतच राहावं लागेल..या सगळ्यात दानवेंच्या कार्यकर्त्यांच अवघड झालं…मात्र कार्यकर्त्यांपासून दूर राहणारे रावसाहेब कसले…

रावसाहेब दानवेंना भेटण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांची रीघ लागली.. आता त्यांची सोय कशी केली जाते हे खुद्द दानवेंच तुम्हाला दाखवतील.. बरं एवढंच नाही तर कार्यकर्त्यांना दिल्लीबद्दल काय वाटतंय हे स्वत: रावसाहेब दानवेच सांगतायेत..ऐका

बरं लागलेली रांग बघून आमच्या प्रतिनिधीने प्रश्न केला आओ ते मास्क, सोशल डिस्टंन्सिंगचं काय तर त्यावरही त्यांनी कार्यकर्त्यांना भारी संभाळून घेतलंय.

कसं आहे एखादा राजकारणी कितीही मोठा मंत्री झाला..तरी कार्यकर्त्यांना जपलंच पाहिजे… ते म्हणतात ना नेत्यापेक्षा कार्यकर्ता मोठा उगाच नाही.. आणि गाव खेड्यात दादा, नाना, काका, दाजी ही उपाधीही या प्रेमातूनच मिळते..कार्यकर्त्यांना जपण्याचे दानवेंचे खूप किस्से आहेत…उगीच नाही काय कार्यकर्ते त्यांना आमचे दाजी म्हणतात.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 6 August 2021
Aaditya Thackeray | रेल्वे प्रवासाबाबत 2 ते 3 दिवसात निर्णय – मंत्री आदित्य ठाकरेंची माहिती